श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान असून त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे !

श्री. गुरुदास नाईक

१.२.२०१७ या दिवशी गोव्यातील व्हरड गावणे या गावात श्री संतोषीमाता मंदिराचा कळस प्रतिष्ठापना सोहळा होता. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला माझ्या भावोजींकडून मिळाले होते. आम्ही पती-पत्नी त्या ठिकाणी गेलो होतो. तो कळस प्रतिष्ठापना सोहळा संत श्री नवनाथ महाराज यांच्या हस्ते पार पडला. ‘मी सनातनचा साधक आहे’, हे माझ्या भावोजींना ठाऊक असल्याने (ते दैनिक सनातनचे वाचक आहेत.) त्यांनी मलाही त्या संतांसमवेत कळस प्रतिष्ठापनेेच्या कार्यात सहभागी व्हायला सांगितले.

तो कार्यक्रम आटोपून आम्ही दोघे लगेच त्या संताचा निरोप घेऊन परत निघालो. त्या वेळी त्यांनी लवकर निघण्याचे कारण विचारले. आम्ही त्यांना ‘रामनाथी आश्रमात सेवेला जातो’, असे सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.’’ त्यांचे हे बोलणे ऐकतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहतांना भगवान शिवच आम्हाला हे सर्व सांगत आहेत’, असे जाणवले.’

– श्री. गुरुदास नाईक, नागेशी, फोंडा, गोवा.

Leave a Comment