जोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे संत भारतभूवर असतील, तोपर्यंत अनिष्ट शक्ती आपला देश आणि धर्म यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत !

‘नमस्कार ! जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंदु राष्ट्र !! हिंदू अधिवेशनाच्या या सहाव्या वर्षी मी आज सनातन संस्थेच्या पावन आणि शुभ आश्रमामध्ये आले आहे.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे हिंदु राष्ट्र
स्थापनेचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यायला हवेत !

मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’

२. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती
केवळ देशाच्याच नाही, तर पूर्ण विश्‍वाच्या समवेत आहे !

धर्मकार्याला विरोधी शक्ती विरोध करू लागतात आणि म्हणतात, ‘‘सनातन संस्थेचे कार्य देशविरोधी आहे.’’ ही गोष्ट असत्य आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती पूर्णतः देशाच्या समवेत आहे; केवळ देशाच्याच नाही, तर पूर्ण विश्‍वाच्या समवेत आहे.

३. आज भारताची विपरीत स्थिती
पहाता ‘अधिवेशन पुष्कळ आवश्यक आहे’, असे मला वाटते !

आपण ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हे सूत्र घेऊन एकत्र वाटचाल करत आहोत. येथे आज केवळ भारतच नाही, तर श्रीलंका, बंगाल, नेपाळ इत्यादी देशांतून लोक आले आहेत. २१ प्रांतांतून आलेले हे लोक एका स्वरात मिळून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ हे घोषवाक्य म्हणतात. यातून हेच सिद्ध होते की, पूर्ण भारताला हिंदु राष्ट्रच हवे आहे. आज भारताची विपरीत स्थिती पहाता ‘अधिवेशन पुष्कळ आवश्यक आहे’, असे मला वाटते.

४. अधिवेशनाचे आयोजन करणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती
समिती यांना शुभेच्छा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रणाम !

या अधिवेशनासाठीचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच येथील पदाधिकारी यांनाही मी मनापासून शुभेच्छा देते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रणाम करते. असे संत, वरिष्ठ आणि महापुरुष जोपर्यंत या भारतभूवर असतील, जोपर्यंत त्यांच्या मनात हिंदु राष्ट्र अन् देश, धर्म यांविषयीचे विचार येत रहातील, तोपर्यंत अनिष्ट शक्ती आपला देश आणि धर्म यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत. जय हिंदु राष्ट्र ।’

– प.पू. साध्वी सरस्वतीजी, विश्‍व हिंदु परिषद, रीवा, मध्यप्रदेश. (१४.६.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment