घणसोली येथील ‘इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’चे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

महाविद्यालयीन विद्यार्थी श्री. शशी यादव यांनी सांगितले, ‘‘बाहेरून आश्रमात पाऊल टाकल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली. बाहेरील आणि आश्रमातील वातावरण पुष्कळ वेगळे आहे.

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथील विवेकानंद शुक्ला यांनी सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट

गाझियाबाद येथे उत्तरप्रदेश राज्य कर सहआयुक्त (जी.एस्.टी.) म्हणून कार्यरत असलेले श्री. विवेकानंद शुक्ला यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

मध्‍यप्रदेशातील डॉ. विष्‍णु जोबनपुत्र यांची सपत्नीक रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

मध्‍यप्रदेशमधील विदिशा जिल्‍ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्‍गुरु सेवा संघ ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त आणि सद़्‍गुरु संकल्‍प नेत्र चिकित्‍सालयाचे संचालक डॉ. विष्‍णु जोबनपुत्र अन् त्‍यांच्‍या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट दिली.

सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भातील सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्‍यकता !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्‍ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्‍टगंध इत्‍यादी सात्त्विक उत्‍पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्‍यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते.

मध्यप्रदेशातील देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट !

गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्‍या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्‍न झाले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमाच्‍या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्‍कळ आनंद देऊन गेली.’

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे पूजन !

पूजन झाल्‍यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्‍यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले.