महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल !

जर महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या पवित्र भूमीत देवाच्या कृपेने पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल.

सनातनचे साधक मनोभावे सेवा करत असल्याने आश्रमात दैवी शक्ती जाणवते ! – कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली

खोपोली येथील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक श्री. कुलदीपक रामदास शेंडे यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला १९ जून या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. दिलीप जाधव, खोपोली येथील उद्योजक श्री. रोहित शेंडे, श्री. सुशांत तेलवणे आणि श्री. जनार्दन जाधव हेही उपस्थित होते.

गोव्यातील खासदार, मंत्री आणि आमदार यांची रामनाथी (फोंडा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

खासदार सदानंद शेट तानावडे, पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दाजी साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांची उपस्थिती ! खासदार, मंत्री आणि आमदार यांनी सनातन संस्थेच्या आश्रमातून चालणारे कार्य आणि सूक्ष्म प्रदर्शन यांविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली.

महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांची सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) ला भेट !

शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे सनातनच्या आश्रमात प्रसन्नता जाणवली ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य

पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

स्वामीजी म्हणाले, ‘‘मी सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो आहे. येथे मला सेवाभाव, अहंकाररहित जीवन यांचे दर्शन घडले. या आश्रमात मला अनेकात एकतेचे दर्शन झाले…

‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !

वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.

रांची, झारखंड येथील हिंदुत्वनिष्ठ लेखिका डॉ. रेणुका तिवारी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि साधक यांच्याविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

फोंडा (गोवा) येथे श्री शांतादुर्गा मंदिर आणि श्री रामनाथ मंदिर या दोन संस्थानांच्या मध्ये ‘हिंदूंना अभिमान वाटावा’, असा सनातन संस्थेचा आश्रम आहे. सनातन संस्था ही संपूर्ण विश्वात हिंदु धर्माचे कार्य करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे.

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.

नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट

सनातनचा आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी यांनी सांगितले की, सनातन आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. आश्रमात सात्त्विकता आणि शांतता अनुभवायला मिळाली. साधकांची साधना आणि सेवा विशेष आहे. असे आश्रम प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत.

भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज

सनातनचा गोवा येथील आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. भोगभूमी अशा कलंकित नावाने ओळखल्या जाणार्‍या गोवा राज्यात एवढा सुंदर आश्रम उभारणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! अशा महापुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, तरी ते अल्पच पडतील, असे आशीर्वचन चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांनी दिले.