नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच ! – आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे

अमृतनगर (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होते. त्यामागे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक कारणे आहेत. याउलट १ जानेवारीलाच नवीन वर्ष का ? याला कुठलाही आधार नाही. त्यामुळे नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच होय, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. अमृतनगर येथे २३ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘खंडोबा देवाचे जागरण’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या प्रसंगी पू. डॉ. शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती.

प्रारंभी आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांनी नमस्कार कसा करावा, स्त्रियांनी कुंकू आणि पुरुषांनी टिळा लावण्याचे महत्त्व, ‘हलाल’ उत्पादने न वापरणे यांसंबंधी माहिती दिली.

विशेष

१. जिज्ञासूंनी ‘हलाल विषय’ ऐकून त्या संदर्भात पंतप्रधानांना पाठवण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षरी केली.

२. कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासूंपैकी एक सौ. सुरेखा देसाई यांनी त्यांच्या गावी आष्टा येथे ‘या संदर्भात प्रबोधनपर विषय ठेवूया’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment