‘फेब्रुवारी २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात शिबिर झाले. त्यात सहभागी झाल्यावर माझ्यात झालेले आमूलाग्र पालट येथे दिले आहेत.

१. साधनेत येण्यापूर्वी असलेले स्वभावदोष
‘साधनेमध्ये येण्यापूर्वी मी (श्री. अविनाश तानाजी गराडे) व्यसनाधीन होतो. इतरांना उलट बोलणे, अरेरावी करणे, मद्य पिणे, चिडचिडेपणा अशा सर्व स्वभावदोषांनी मी ग्रस्त होतो. ‘पैसा मिळवणे’, हेच माझे ध्येय होते.
२. साधनेत आल्यावर झालेले पालट
साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते. पूर्वी माझ्या स्वभावात अहंभावाचे प्रमाण पुष्कळ होते; परंतु आता साधना केल्यामुळे अहंभाव न्यून होत आहे. आता ‘हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी सतत सक्रीय असणे’, हेच माझ्या जीवनाचे ध्येय झाले आहे.
३. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे झालेला लाभ
धर्मशिक्षणवर्गात शिकवलेल्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा मला लाभ झाला. त्यामुळे समष्टी सेवेत येणार्या अडचणी प.पू. गुरुमाऊली तुमच्या कृपेने दूर होत आहेत, उदा. पूर्वी प्रसारसेवेत मीपणा, संकुचितपणा, ‘मी का बोलू आणि सांगू ?’ ही वृत्ती माझी अडवणूक करत असे; पण अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे हे अडथळे दूर होत आहेत.
‘प.पू. गुरुमाऊली, तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अविनाश तानाजी गराडे, पिंपळखुटे, तळेगाव, पुणे. (१९.३.२०२३)
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वामुळे त्यांचा देह आणि वाहन यांत झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !
पू. (सौ.) अश्विनी पवार या छायाचित्रात इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा...
सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्राचा भाग प्रकाशमान दिसणे आणि डोक्याच्या मागे प्रभावळ...
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करू लागल्यावर साधिकेला झालेले लाभ !
सनातनची साधिका कु. मेघा चव्हाण यांच्याकडे आणि त्यांच्या छायाचित्राकडे बघून साधकांना जाणवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांमागील आध्यात्मिक...
‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या वचनाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली प्रचीती !