रात्री फोडण्यात येणार्‍या फटाक्यांच्या संदर्भात प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या कार्यवाहीसाठी उज्जैन येथे विविध संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, हे प्रशासनाला का सांगावे लागते ?

डावीकडून सर्वश्री मयंक वर्मा, विवेक गर्ग, निर्भय सिंह, हेमंत जुवेकर, निवेदन स्वीकारतांना प्रशासकीय अधिकारी, मनीषसिंह चौहान, आनंद जाखोटिया, सौ. स्मिता कुलकर्णी, हरि माळी आणि दिनेश श्रीवास्तव

उज्जैन – ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार फटाके फोडण्याचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. दिवाळीच्या काळात केवळ रात्रीचे ८ ते १० या कालावधीत फटाके फोडण्याची अनुमती देण्यात आली, तर नाताळ आणि ३१ डिसेंबरला ख्रिस्ती नववर्षाच्या रात्री ११ वाजून ५५ मिनिटे ते १२ वाजून १३ मिनिटांपर्यंतच्या कालावधीत फटाके फोडण्याची अनुमती देण्यात आली आहे. दिवाळीप्रमाणे २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीतही नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. त्यामुळे या कालावधीतही पर्यावरण रक्षण होण्याच्या दृष्टीने फटाके फोडण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या समयमर्यादेचे पालन करण्यात यावे, तसेच असे न करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी २४ डिसेंबर या दिवशी विविध संघटनांच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि खासदार श्री. चिंतामण मालवीय यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री स्वर्णिम भारत मंचाचे अध्यक्ष दिनेश श्रीवास्तव, अ.भा. शिवसेना गौरक्षा न्यासचे प्रदेशाध्यक्ष मनीषसिंह चौहान, हरि माळी, भारत रक्षा मंचाचे अधिवक्ता विवेक गर्ग, निर्भय सिंह, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक आनंद जाखोटिया, हेमंत जुवेकर, शिवम सोनी, मयंक वर्मा, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात