दैवत्व शोधा, आत्मशोध घ्या
सनातन आश्रमात आपले स्वागत आहे
ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.
सनातन आश्रमास भेट का द्यावी ?
हिंदु राष्ट्र-स्थापनेचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनातून घडलेला आणि ईश्वरी राज्याची प्रतिकृती असलेला सनातन आश्रम !
आश्रम जीवनात ध्यान, साधना, सेवा आणि शिस्त यांचा समावेश असतो. साधक एकमेकांच्या सहवासात राहून, एकमेकांचे मार्गदर्शन करतात आणि आध्यात्मिक उन्नती साधतात. सनातन आश्रम जीवन हे साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. येथे साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. आश्रमातील जीवन हे एकात्मतेचे, शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक साधनेसाठी प्रेरणादायक आहे. सनातन आश्रमात सूक्ष्मजगतावरील एक अद्वितीय प्रदर्शनी आहे – हे प्रदर्शन म्हणजे अदृश्य जगाचे दृश्यमान परिणाम दाखवणारे संग्रहालय आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय मागील चार दशकांमध्ये संकलित केलेल्या आणि काळजीपूर्वक जतन केलेल्या वस्तूंचा एक अमूल्य ठेवा आहे. येथे तुम्हाला सूक्ष्म जगाचे सकारात्मक तसेच नकारात्मक भौतिक परिणाम प्रत्यक्ष पाहण्याची व अनुभवण्याची संधी मिळते.
अदृश्य जगाचे दृश्यमान परिणाम अनुभवा !
सनातन आश्रम : सर्व साधनामार्गावरील साधकांसाठी मार्गदर्शक !

भक्तियोग
प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे, ईश्वराच्या चरणी समर्पण करणे.

कर्मयोग
शारीरिक आणि बौद्धिक सेवा अपेक्षेविरहि्त परिपूर्ण करणे

ज्ञानयोग
सत्संग, आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन, अध्यात्माचा प्रसार करणे

ध्यानयोग
नामजप करणे आणि आध्यात्मिक उपचार पद्धतींचे पालन करणे
आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांचे अभिप्राय
चैतन्यात समरस व्हा !
देवत्वाचा शोध घ्या, आत्मशोध घ्या !
सनातन आश्रमाला अवश्य भेट द्या
आपली आश्रम भेट अधिक सुनियोजित तसेच सुरळीत व्हावी यासाठी, कृपया आपण येण्यापूर्वी ईमेल अथवा फोनद्वारे आम्हाला अवश्य कळवावे ही विनंती.
सनातन संस्थेविषयी
आमचे संस्थापक

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भूतपूर्व संमोहन उपचारतज्ञ आणि संशोधक असून त्यांनी आपले गुरु संत भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने सनातन आश्रमाची स्थापना केली.
आमचा उद्देश

जिज्ञासूंना अखंड आध्यात्मिक मार्गदर्शन करणे, समाजात धार्मिक व आध्यात्मिक आचारधर्माचा प्रसार करणे, आणि धार्मिक व्यक्तींना एकत्र करून एक सात्त्विक तसेच चांगले विश्व घडवणे
आमचे उपक्रम

आनंदी जीवनासाठी विनामूल्य सत्संग (ऑनलाइन आणि ऑफलाइन), व्यसनमुक्ती अभियान, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्र आणि धर्म विषयक प्रकाशने, गुरुपौर्णिमा उत्सव, धर्मशिक्षण
आमच्याशी संपर्क साधा
भेट द्या !
योगदान द्या !
सहभागी व्हा !
अध्यात्म तुमचे जीवन बदलू शकते. जीवनात आमूलाग्र पालट घडविण्यासाठी आमच्या विनामूल्य सत्संगात सहभागी व्हा











































