सामाजिक एकोप्याचे प्रतीक अन् राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्याचा ऊर्जास्रोत असलेला आश्रम !

राष्ट्र आणि धर्म यांप्रती निष्ठा वाहिलेले साधक !

जातीभेद आणि उच्च-नीचता यांचा लवलेशही नसणे !

आश्रमात साधकानां राष्टप्रेम आणि धमप्रेम शिकवले जाते. त्यामुळे त्याच्यांमध्ये राष्ट्रबंधुत्व अन् धमबंधुत्व निर्माण होऊन सघंटित भावही आपाेआप निमार्ण हाेतो.

ईश्‍वरप्राप्ती हे अंतिम ध्येय गाठण्यासाठी अहंचा लय करण्याचा प्रयत्न प्रत्येक साधक करत असतो. त्यामुळे त्याच्या मनात जात-पात, उच्च-नीचता आदींचे विचारही येत नाहीत. अनेक दिवस आपल्या समवेत रहाणार्‍या साधकांची जातही साधकांना ठाऊक नसते; किंबहुना ती त्याने विचारलेलीही नसते. परिणामी सनातनच्या आश्रमात विविध जातीपंथांचे साधक आनंदाने सहजीवन जगत आहेत. यातून ईश्‍वरप्राप्तीच्या अत्युच्च ध्येयामुळे एकसंध समाज निर्माण करता येतो, हे स्पष्ट होते.

सनातन आश्रमात माणूस घडवला जात आहे ! – प.पू. नरेंद्रनाथ महाराज (मच्छिंद्रनाथांनंतरचे नाथ संप्रदायातील १६ वे पदाधिकारी)
सनातनचा रामनाथी आश्रम वैकुंठधामच नाही, तर परमधाम आहे. येथील साधकांमध्ये प्रेमभाव ओतप्रोत असून ते भावपूर्ण अन् अहंरहित सेवा करत आहेत. येथे येऊन मी धन्य झाले. – गुरु माँ गीतेश्‍वरीजी, गीता आश्रम, देहली. (७.२.२०१५)
रामनाथी आश्रम पाहिल्यानंतर सनातनचे व्यापक स्वरूप लक्षात येते. आश्रम पाहून सनातनचे कार्य मला एका विशाल समुद्राप्रमाणे भासले. – श्री विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती, नंदी, बेंगळुरू. (२७.४.२०१६)

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्याचा ऊर्जास्रोत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे विविध विभाग आश्रमामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हा आश्रम राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांसाठी ऊर्जास्रोत बनला आहे.

 

सनातन कलामंदिराद्वारे धर्मसत्संगांची निर्मिती !

धर्मशिक्षण देणार्‍या धर्मसत्संगांचे ३७० भाग बनवण्यात आले असून त्यांचे प्रसारण राष्ट्रीय व स्थानिक चॅनेलवरून झाले आहे.

 

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणार्‍या ग्रंथांची निर्मिती !

साधना, राष्ट्र धर्म इ. विषयांवर फेब्रुवारी २०१९ पर्यंत ३११ ग्रंथांच्या १७ भाषांत ७५ लाख ४० सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत .

 

नियतकालिके अन् संकेतस्थळे यांद्वारे जनजागृती !

सनातन प्रभात नियतकालिके अन् Hindujagruti.org सारखी संकेतस्थळे यांच्याद्वारे राष्ट्र व धर्म यांच्या संदर्भात जागृती होते.

 

सनातन साधक-पुरोहित पाठशाळा !

हिंदु समाजाला धार्मिक विधी साधना म्हणून करणारे साधक-पुरोहित देण्यासाठी ही पाठशाळा कार्यरत आहे.