जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !

पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते. भाजी चिरण्यासारखी प्रत्येक कृती करण्यामागेही काहीतरी शास्त्र आहे. ते समजून योग्य प्रकारे कृती केली, तर तिच्यातून साधना होते. कोणतीही कलाकृती सात्त्विक बनवल्यास त्यातून स्वतःला अन् इतरांनाही सात्त्विकता लाभते. अशा प्रकारे प्रत्येक कृतीतून साधना होण्यासाठी ती कृती परिपूर्ण, भावपूर्ण आणि सात्त्विकतेचा विचार ठेवून कशी करायची, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले आहे.

Leave a Comment