रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये आणि त्यामागील कारणे !

पणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये आणि त्यामागील कारणे

ramnathi_ashram_diwali
दिवाळीला लावलेल्या पणत्यांमुळे उजळून निघालेला रामनाथी येथील सनातनचा आश्रम !

‘रामनाथी आश्रमात १.११.२०१६ या दिवशी रात्री ८ वाजता दिवाळीनिमित्त लावलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या. त्यामुळे आश्रमाच्या भिंतीही लाल रंगाच्या दिसत होत्या. एरव्ही ज्योत पिवळ्या रंगाची दिसते. ज्योती लाल रंगाच्या दिसण्याची कारणे येथे दिली आहेत. पणत्यांच्या ज्योतींतून सप्तरंगी किरण आणि कण मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसत होते याची कारणेही येथे दिली आहेत.

पणतीची ज्योत आणि भिंती लाल रंगाच्या दिसण्यामागील कारणे

१. ‘अग्निनारायणाची दोन रूपे आहेत. पिवळ्या ज्योतीच्या स्वरूपात दिसणारे रूप तारक असते आणि लाल ज्योतीच्या स्वरूपात दिसणारे रूप मारक असते.

२. पिवळ्या ज्योतीच्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी होते आणि त्यातून ज्ञानकण सर्वत्र पसरतात.
पिवळ्या ज्योतीने वातावरणाची शुद्धी होते आणि त्यातील सत्त्वगुणाची वृद्धी होते.

३. लाल ज्योतीच्या माध्यमातून वातावरणातील अशुद्धी नष्ट होते, म्हणजे वातावरणातील रज-तम नष्ट होण्यास साहाय्य होते. या कार्यासाठी पणतीतून लाल ज्योतीचे प्रकटीकरण झाले.

४. अग्निनारायणाचे ज्योतीद्वारे सौम्य प्रकटीकरण असते, तेव्हा त्याचा प्रभाव पणतीभोवती काही सें.मी. अंतरापर्यंत असतो. या वेळी अग्नितत्त्वाचे प्रकटीकरण अधिक असल्याने भितींवरही लाल रंग दिसत होता.

५. पणतीची ज्योत लाल रंगाची दिसणे, हे अग्नितत्त्वाची साथ मिळत असल्याचे दर्शक आहे. कालांतराने वातावरणातील इष्ट-अनिष्ट शक्तींच्या लढ्यात पंचतत्त्वांच्या सहभागाचे प्रमाण वाढत जाईल.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०१६)

पणत्यांच्या ज्योतींतून सप्तरंगी किरण आणि कण मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होण्याची कारणे

१. ज्योतींतून सप्तरंगी किरण आणि कण मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसणे, हे तेजतत्त्वात्मक
प्रगट ऊर्जेचे दर्शक आहे.

२. प्रतिकूल काळाचा प्रभाव अधिक असला की, ज्योतीच्या सप्तरंगी किरणांचे काही अंतरापर्यंत वातावरणातील इष्ट-अनिष्ट शक्तींचा लढा चालू असतो. ज्योतीतील तेजाच्या ‘अंश-अंशात्मक’ कणांच्या ऊर्जेने वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होते, म्हणजे ज्योतीतून एकाच वेळी किरणांच्या माध्यमातून वातावरणातील इष्ट-अनिष्ट शक्तींशी लढा आणि कणांद्वारे आनंदाचे प्रक्षेपण चालू असते.

३. यज्ञाच्या शुद्ध ज्वाळेतून एकाच वेळी बहुविध कार्य घडते, तसेच ज्योतरूपी यज्ञातून अग्निनारायणाचे बहुविध कार्य चालू असल्याचे, हे दर्शक आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०१६)