यमराजाची धर्माधिष्ठित न्यायप्रणाली !

८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.

कल्याण (ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी १ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांची लक्षात आलेली विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये

प.पू. देवबाबा यांनी अनेक वने आणि विविध ठिकाणी जाऊन खडतर तपश्चर्या केली आहे. त्यांची ही तपश्चर्या अजूनही चालू आहे. हे त्यांच्या दिनक्रमावरून लक्षात येते.

दृष्टीहीन असूनही भोळ्या भावाच्या आधारे पू. (सौ.) संगीता पाटील झाल्या सनातनच्या ८५ व्या संत !

भोसरी (पुणे) येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य ! – सौ. स्मिता माईणकर , सनातन संस्था

हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी तथा पुणे येथील ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) यांनी २६ मार्च या दिवशी त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली

सनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शन कक्षास पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांची भेट !

पाचोरा येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २३ मार्च या दिवशी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे आणि ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

पुणे येथील खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या मानवी साखळीत सनातन संस्थेचा सहभाग !

गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून यशस्वीपणे चालू आहे.