
रामनाथी (गोवा) – किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. सनातनचे साधक दांपत्य श्री. सुयोग आणि सौ. सुमुखी आठवले यांनी आश्रमात प्रवेश करतांना त्यांना हार घालून औक्षण केले. या वेळी सनातनच्या पुरोहित पाठशाळेचे संचालक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी मंत्रपठण केले. या वेळी प.पू. दास महाराज आणि सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, तसेच आश्रमातील साधक उपस्थित होते.
सनातनचे साधक श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी प.पू. देवबाबा, त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव आणि प.पू. देवबाबा यांच्या शिष्या कु. प्रसन्नालक्ष्मी यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म याविषयीच्या कार्याची, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून चालू असलेले संगीत, संशोधन याविषयीच्या कार्याची माहिती दिली.प.पू. देवबाबा यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने आश्रमातील साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...