विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य ! – सौ. स्मिता माईणकर , सनातन संस्था

मार्गदर्शन ऐकतांना विद्यार्थी

सांगली – अभ्यास करतांना मनाची एकाग्रता महत्त्वाची असते. मनात येणारे विचार नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे पटकन घालवणे शक्य असते. अलीकडच्या काळात सर्वांनाच ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास नेहमी आनंदी रहाणे शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर यांनी केले. हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याचा लाभ २७ विद्यार्थ्यांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment