श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री बिरदेव यांचे भक्तगणांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !
ढोलांचे गजर (वालंग), नामघोष, गजी नृत्य, तलवार नाचवणे (बनगर नृत्य) यांमुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सायंकाळी पू. भगवान डोणे महाराज यांचा भाकणुकीचा विशेष कार्यक्रम होता.