रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

१. ‘रामनाथी आश्रमात पुष्कळ सात्त्विकता अनुभवायला मिळाली. आश्रमात आल्यावर माझे मन शांत झाले आणि भाव जागृत झाला.’ – श्री. मुन्ना कुमार शर्मा (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा), नवी देहली

२. आश्रमातील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो !

‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो. ‘गुरुदेवांना पुष्कळ दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची कृपा आमच्यावर सदैव राहो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
– श्री. वीरेश त्यागी (राष्ट्रीय कार्यालय मंत्री, अखिल भारत हिंदु महासभा), उत्तरप्रदेश

३. ‘आश्रम पाहून मला पुष्कळच चांगले वाटले. मला येथून परत जावेसे वाटत नाही.’ – शकुंतला कुमारी, नोएडा, उत्तरप्रदेश.

४. ‘आश्रम पाहून माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले. गुरुदेव आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या संदर्भात दूरदृष्टी ठेवून त्यासाठी अखंड अभियान चालवणे, ही अत्यंत वंदनीय गोष्ट आहे.’ – श्री. पुरुषोत्तम सोमाणी (दी निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री), निजामाबाद, तेलंगाणा.

५. ‘आश्रमातील साधकांचा सेवाभाव पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’ – श्रीमती निर्मला सोमाणी, निजामाबाद, तेलंगाणा.

६. ‘आश्रम पाहून आम्हाला ‘चराचरात ईश्वराचा वास आहे’, अशी दैवी अनुभूती आली. गुरुदेवांच्या श्री चरणकमलांमुळे हा संपूर्ण परिसर भावमय झाला आहे.’ – श्री. रवींद्र राणावत, रत्नागिरी, महाराष्ट्र.

Leave a Comment