राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

 

रामनाथी (गोवा) – लखनौ (उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धर्मेंद्र शुक्ला यांनी १५ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. श्री. शुक्ला यांच्यासह त्यांचे सहकारी श्री. नारायण प्रसाद पाण्डेय (राष्ट्रीय महामंत्री आणि गोवा प्रभारी, राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघ), श्री. सुभाष कुशवाह, श्री. अजित कुशवाह आणि श्री. सुभाष सिंह उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर श्री. शुक्ला यांचा सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, तसेच हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

आश्रम पाहिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. शुक्ला म्हणाले, ‘‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. येथील व्यवस्थापन पुष्कळ उत्तम आहे. आश्रमाला लवकरच दुसर्‍यांदा भेट देण्याची प्रबळ इच्छा आहे.’’

Leave a Comment