दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

आश्रम पाहून अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

१. ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम अप्रतिम वाटला. तो पाहिल्यावर माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. आश्रम पाहून ‘स्वर्ग’ असे जे काही म्हणतात, तो हाच आहे’, असे मला वाटले. येथे स्वर्गाप्रमाणेच कशाचीही न्यूनता नाही.’

– अधिवक्त्या (कु.) कविता एस्. पवार, सहखजिनदार, प्रहार अपंग क्रांती संस्था, धुळे, महाराष्ट्र.

२. ‘सनातनचा आश्रम अत्यंत अप्रतिम वाटला. येथे येऊन अत्यंत प्रसन्न वाटत आहे. आश्रमातील व्यवस्था, नियोजन आणि चैतन्य अद्भुत आहे. आश्रम सर्व सुव्यवस्थांसहित परिपूर्ण आहे.’

– अधिवक्त्या (कु.) गायत्री प्रकाश वाणी, धुळे

३. ‘सनातनचा आश्रम पाहून मन प्रसन्न आणि शांत झाले. दिवसभरातील थकवा निघून गेला.’

– अधिवक्ता अमित मधुकर दुसाने, धुळे

(सर्व सूत्रांचा दिनांक ११.६.२०२२)

 

हिंदुत्वनिष्ठांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
आध्यात्मिक मार्गदर्शनाला अनुसरून कार्यरत होणे आवश्यक !
– सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज, कल्याण, ठाणे.

सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज, कल्याण, ठाणे.

सनातन संस्थेच्या माध्यमातून चालू असलेले धर्मकार्य प्रचंड आहे. आज त्याची नितांत आवश्यकता आहे. सनातन संस्थेचे साधक राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी करत असलेला त्याग हा सर्वांसाठी अनुकरणीय असा आहे. सध्या चालू असलेल्या दहाव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातीलच नव्हे, तर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रेमी संस्था यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत होणे आवश्यक आहे.

Leave a Comment