रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांचे अभिप्राय

माझ्या मागील २ वर्षांच्या अनुभवावरून आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण आहे, जे उत्तरोत्तर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. माझ्या आध्यात्मिक चेतनेच्या आधारावरून येथे ब्रह्मांडातील ऊर्जा स्थलांतरित होत असल्याचे जाणवते, जी काळानुरूप भविष्यामध्ये अधिक वाढेल.

सनातनचा आश्रम दैवी शक्तीचा स्रोत आहे ! – श्री. पी. पद्मनाभ भट, इंदूर, तेलंगण

आश्रमात अतिशय दैवी शक्ती जाणवली. या दैवी शक्तीमुळे येथे चमत्कार घडतांना मी पाहू शकतो. नोव्हेंबर २०१७ नंतर या आश्रमाला अधिक गती प्राप्त होईल. आश्रमाचे कार्य झपाट्याने वाढेल आणि त्याची ख्याती दूरवर पसरेल.

कोल्हापूर येथील भाजपचे प्रदेश सहसंयोजक सुमित ओसवाल यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

सौ. काजल म्हणाल्या, आश्रम म्हणजे भेट द्यावी अशी शांत जागा आहे. मला परत आश्रमात येऊन काही दिवस रहायला आवडेल. साधक खूपच मनमिळावू आहेत. एवढे की त्यांनी आमच्या हृदयात जागा केली.

सनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो ! – धर्मप्रेमी सौ. स्नेहा अग्रवाल

खोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.

तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आगमन

महर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री. आदर्श बालाजी (वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांची मुलगी सौ. अभिरामी यांचा मुलगा) यांचे १४ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र ! – समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत केली जाते, असे मार्गदर्शन दादेगाव, तालुका अष्टी, जिल्हा बीड येथील समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले.