गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

रायचूर (कर्नाटक) येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

धर्मरथामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे रायचूर समन्यवक श्री. रमेश बी, श्री. सुरेंद्र चाळके, धर्माभिमानी श्री. श्याम यादव आणि श्री. मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते.

मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलनात सनातनच्या ग्रंथाचे प्रदर्शन !

या कार्यक्रमात सनातनच्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. अनेकांनी ‘हे ग्रंथ वेगळे आहेत’, अशा शब्दांत ग्रंथांचे कौतुक केले. हे प्रदर्शन लावण्यासाठी मुक्त संवादचे श्री. मोहन येडगावकर आणि अन्य सदस्य यांचे सहकार्य लाभले.

मी… सनातनचे ग्रंथविश्‍व… परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मदूत !

शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !

भावी भीषण संकटकाळासाठी उपचार-पद्धतींची आवश्यकता

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्‍वभूमीवर पुढील विचारमंथन निश्‍चितच लाभदायक ठरेल.   महायुद्धाच्या काळात स्थिती काय असते ? दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच … Read more

देवनदी गंगेचे रक्षण करा !

गंगा नदीला स्वच्छ ठेवणे आणि तिचा प्रवाह अखंडित राहील, याचा आग्रह धरणे, हे आपले मानवीय, सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे. या ग्रंथात प्रामुख्याने गंगेवरील संकटांची कारणे आणि उपाययोजना यांचा वेध घेतला आहे.

गंगामाहात्म्य(आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)

या ग्रंथात गंगा नदीची अदि्वतीय वैशिष्ट्ये, गंगा नदीचे काठ, गंगोपासकाने करावयाच्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांविषयी माहिती विशद केली आहे.

कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण

‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’ या ग्रंथात कुंभमेळ्याचे माहात्म्य, कुंभक्षेत्री करावयाचे आचरण आणि कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन यांविषयी विवेचन केले आहे.

‘सनातन’ची अनमोल
ग्रंथसंपदा आता ‘ऑनलाईन’ खरेदी करा !

मानवजातीच्या उद्धारासाठी परात्परगुरु प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्मशास्त्र, धार्मिक कृती, देवतांची उपासना, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, संतचरित्र इत्यादी विषयांवर आतापर्यंत १९१ ग्रंथ संकलित केले आहेत.

देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र

सर्व देवीरूपांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृती या सारख्याच आहेत. प्रस्तूत लघुग्रंथात अशा कृतींचे, तसेच सण, उत्सव इत्यादींच्या प्रसंगी केल्या जाणार्‍या देवीपूजनाशी संबंधित विशिष्ट कृतींचे शास्त्र दिले आहे.