सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् व्याख्याने यांद्वारे प्रसार !

अधिवक्ते, आधुनिक वैद्य, उद्योगपती, पत्रकार आणि धर्मप्रेमी यांच्याशी साधला ‘ऑनलाईन विशेष संवाद’

 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात येथील १ सहस्र ८०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

मुंबई – गुरुपौर्णिमेच्या कालावधीत नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा आध्यात्मिक लाभ जिज्ञासूंना अधिकाधिक व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या १ मासापासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात येथे ‘ऑनलाईन’ ८९ प्रवचने घेण्यात आली. यांतून १ सहस्र ४८६ जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या ठिकाणी १२ ‘ऑनलाईन’ व्याख्याने घेण्यात आली. याचा लाभ ३२६ धर्मप्रेमींनी घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त अधिवक्ते, आधुनिक वैद्य, उद्योगपती, पत्रकार आणि धर्मप्रेमी यांच्याशी ‘ऑनलाईन विशेष संवाद’ साधण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवचनांमध्ये गुरु-शिष्य परंपरा, गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत, त्याग आणि अर्पण यांचे महत्त्व, दैनंदिन जीवनात करावयाची योग्य साधना यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानांतून ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment