
१. प.पू. डॉक्टरांच्या हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होणे, म्हणजे
त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वराच्या सर्वव्यापी प्रीतीच्या रंगाचा तो चमत्कार असणे
‘प.पू. डॉक्टरांची त्वचा, नखे, केस जसे पिवळे, सोनेरी होत आहेत, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आतील भाग हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होत आहेत. प.पू. डॉक्टरांमध्ये असलेल्या ईश्वराच्या सर्वव्यापी प्रीतीच्या रंगाचा तो आविष्कार आहे.
२. बोटांच्या पेरांचे अग्रभाग अधिक गुलाबी होणे
प.पू. डॉक्टरांच्या हाताच्या बोटाच्या पेरांचे अग्रभाग अधिक गुलाबी दिसतात; कारण बोटांचे अग्रभाग कार्यात अधिक संवेदनशील असल्याने या भागांतून प्रीतीदर्शक गुलाबी रंग अधिक बाहेर पडतांना दिसतो.
३. प.पू. डॉक्टर बोलत असतांना ओठांचा, तसेच जीभेचा रंग अधिक गुलाबी होतांना जाणवणे
प.पू. डॉक्टर बोलतात, त्या वेळी त्यांच्या ओठांचा, तोंडातील आतील पोकळीचा, तसेच जीभेचा रंग अधिक गुलाबी होतांना दिसतो. त्यांच्या वाणीतून समष्टीच्या कल्याणासाठी बाहेर पडणार्या प्रीतीदर्शक लहरींच्या स्पर्शाने त्यांच्या तोंडाच्या पोकळीतील प्रीतीदर्शक गुलाबी रंगाला जागृती येत असल्याचेच हे लक्षण आहे.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०११)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीतीचा दृश्य परिणाम !



सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वास्तव्य केलेल्या खोलीत येणारा प्रकाश पडणार्या भिंतीवर सप्तरंग दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या काळानुसार पालटणार्या विविध उपाध्यांविषयीचे स्पष्टीकरण !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रांतून दिसणारी असामान्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र !
प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तींतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले जीवनदर्शन !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्वचेची ठेवण श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे, म्हणजेच इंग्रजी भाषेतील...