बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी आनंदवार्ता !

नम्र, प्रामाणिक आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले अधिवक्ता विजयशेखर जन्म-मृत्यू फे-यातून मुक्त

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक येथील पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या आध्यात्मिक प्रगतीच्या सुवार्तेविषयी अधिवक्ता विजयशेखर यांनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘ही घटना माझ्यासाठी अनपेक्षित होती. येथून पुढे आता पुष्कळ पुष्कळ धर्मकार्य करायचे आहे’, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. पू. रमानंद गौडा आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा यांनी अधिवक्ता विजयशेखर यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

Leave a Comment