परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !

मागील जन्मांपैकी ज्या जन्मांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे जन्म आणि त्यात घडलेले प्रसंग यांविषयीचे विश्‍लेषण सदर लेखात दिले आहे.

व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधना मनापासून आणि परिपूर्ण करणारे अन् सर्वार्थांनी आदर्श असलेले पू. संदीप आळशी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (२२.११.२०१७) या दिवशी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अवनी, भाऊ श्री. संतोष आणि भावजय सौ. सुप्रिया यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांच्याकडे जातांना, तेथे गेल्यावर आणि त्यांनी तबल्याच्या बोलाचा मंत्र दिल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे

प.पू. देवबाबांकडे जायचे ठरल्यावर ‘माझा तबल्याचा सराव पुरेसा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन मला लाभ होणार नाही’, असा नकारात्मक विचार येत होता. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर मन सकारात्मक झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०१७ पासून चालू झालेला आणखी एक महामृत्यूयोग आणि त्यामागील शास्त्र

एप्रिल २००९ या काळात मडगाव, गोवा येथील ‘अपोलो रुग्णालया’त ते भरती होते. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी आशा सोडूनही संतांच्या आध्यात्मिक उपायांमुळे प.पू. डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळला !

विज्ञानयुगात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे जगद्गुरु सर्व जगाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी अवतरले आहेत ! – प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी

ज्यांना सूर्य आणि सागर यांची उपमाही अल्प पडावी, असे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असे भावपूर्ण उद्गार भाळवणी (विटा) येथील संत प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य प.पू. दादा महाराज यांनी काढले.

प्रापंचिक कर्तव्ये निरपेक्षतेने करतांना अखंड ईश्‍वरी अनुसंधानात रहाणार्‍या कोल्हापूर येथील श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) सनातनच्या ७१ व्या संतपदी विराजमान !

अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्‍या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची आनंदमय घोषणा ९ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात करण्यात आली.

कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी ! सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना … Read more

अध्यात्म या विषयावर साधना नसणार्‍या एका लेखकाने, एका भोंदू गुुरूने लिहिलेली पुस्तके आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचा साधक-वाचकांवरील परिणाम अभ्यासणे

भोंदू गुरु अध्यात्मावर पुस्तके लिहितात आणि विदेशातही अध्यात्मावर लिखाण होत असून ही पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्यामुळे अध्यात्मावर पुस्तक लिहिणारा कसा आहे आणि त्याच्या पुस्तकाचा वाचकावर कसा परिणाम होऊ शकतो ?, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय असलेले सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ !

श्री. नीलेश सिंगबाळ सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांच्यात चिकाटी, वात्सल्यभाव, इतरांना समजून घेणे, शांत वृत्ती, स्थिरता, ध्येयनिष्ठता, तत्त्वनिष्ठता, सेवेतील परिपूर्णता, त्याग आणि निरपेक्ष प्रेम (प्रीती), अशा अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय आहे.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ध्यानमंदिरात पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण आरास

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरातही आरास करण्यात आली होती.