अध्यात्म या विषयावर साधना नसणार्‍या एका लेखकाने, एका भोंदू गुुरूने लिहिलेली पुस्तके आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचा साधक-वाचकांवरील परिणाम अभ्यासणे

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यू.टी.एस्. उपकरण

अध्यात्म ही हिंदु धर्माची मानवजातीला अनमोल देणगी आहे. आत्म्याचे स्वरूप काय ? खरा मी म्हणजे कोण ? मी कुठून आलो ? कुठे जाणार ? इत्यादींसंबंधीचे ज्ञान म्हणजे अध्यात्म. प्राचीन काळापासून अध्यात्म या विषयावर संतांनी विपुल ग्रंथलिखाण केले आहे. सध्या समाजात भोंदू गुरूंचे प्रस्थ पुष्कळ वाढले आहे. भोंदू गुरु अध्यात्मावर पुस्तके लिहितात आणि गुरुपणाचा आव आणून लोकांना मार्गदर्शन करतात. विदेशातही अध्यात्मावर लिखाण होत असून ही पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्यामुळे अध्यात्मावर पुस्तक लिहिणारा कसा आहे आणि त्याच्या पुस्तकाचा वाचकावर कसा परिणाम होऊ शकतो ?, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच त्या विषयावर एका लेखकाने लिहिलेले पुस्तक, एका भोंदू गुरूने लिहिलेले पुस्तक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचे वाचन केल्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणारा साधक आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांवर काय परिणाम होतो ?, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी १०.९.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांना अध्यात्माविषयी एका लेखकाने लिहिलेले पुस्तक, एका भोंदू गुरूने लिहिलेले पुस्तक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ प्रत्येकी २० मिनिटे वाचण्यास सांगितले होते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांनी एका लेखकाने लिहिलेले पुस्तक, एका भोंदू गुरूने लिहिलेले पुस्तक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचे वाचन आरंभ करण्यापूर्वी आणि वाचन केल्यानंतर त्यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. एका लेखकाने अध्यात्म या विषयावर लिहिलेले पुस्तक

हे एका लेखकाने (म्हणजे साधना न करणार्‍या सर्वसाधारण व्यक्तीने) अध्यात्माविषयी लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे.

२ आ. एका भोंदू गुरूने अध्यात्म या विषयावर लिहिलेले पुस्तक

हे एका भोंदू गुरूने अध्यात्माविषयी लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्म या विषयावर संकलित केलेला ग्रंथ

हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्माविषयीचा इंग्रजी भाषेतील ग्रंथ आहे. अध्यात्माविषयी अपसमज कोणते आणि त्यांची कारणे काय ? इतर विषय, विशेषतः विज्ञान यांपेक्षा अध्यात्म श्रेष्ठ का ? अध्यात्माचा अभ्यास करतांना कोणत्या अडचणी येतात ? सुखदुःखाची कारणे कोणती आणि ती कारणे दूर करून त्यांच्या पलीकडच्या आनंदाची अनुभूती कशी घ्यायची ? इत्यादी गोष्टींचे विवेचन या ग्रंथात केले आहे.

या चाचणीतील व्यक्तींची प्रभावळ मोजण्यासाठी त्यांच्या लाळेचा नमुना म्हणून वापर करण्यात आला.

 

३. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

सारिणीतील प्रभावळींच्या संदर्भात सूचना

चाचणीतील घटकाची प्रभावळ मोजणारा यू.टी.एस्. स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो. हे लक्षात घेऊन ३ अ १ आणि ३ अ २ या सारण्या वाचाव्यात.

३ अ. अध्यात्म या विषयावर एका भोंदू गुुरूने आणि एका लेखकाने स्वतंत्रपणे लिहिलेली पुस्तके अन्
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ग्रंथ यांचा साधक-वाचकांवर झालेला परिणाम

३ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या संदर्भातील निरीक्षणे

३ अ १ अ. प्रयोगातील निरीक्षणांचे विवेचन

३ अ १ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्या साधकामधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होणे; पण त्याने एका लेखकाचे किंवा एका भोंदू गुरूचे अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यावर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा अनुक्रमे वाढणे किंवा तेवढीच रहाणे

प्रथम आपण इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात घेतलेली निरीक्षणे पाहू. चाचणीच्या आरंभी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात होती. त्याने साधना न करणार्‍या एका लेखकाचे अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे त्या साधकामधील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली आणि तिची प्रभावळ साधकापासून ७४ सेंटीमीटर दूरपर्यंत मोजली गेली. एका भोंदू गुरूचे अध्यात्मावरील पुस्तक वाचण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात होती आणि ते पुस्तक वाचल्यानंतर ती तेवढीच राहिली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचण्यापूर्वी त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात होती. ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झालेली दिसून आली. याचा अर्थ तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला; पण साधना न करणार्‍या एका लेखकाचे अध्यात्मावरील पुस्तक आणि एका भोंदू गुरूचे अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यामुळे त्या साधकाला आध्यात्मिक स्तरावर तोटा झाला, असे म्हणता येईल.

चाचणीच्या आरंभी आणि नंतर केलेल्या निरीक्षणांत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ अ १ अ २. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यावर त्या साधकात थोडी सकारात्मक ऊर्जा निर्माण होणेे; पण साधना न करणार्‍या एका लेखकाचे किंवा एका भोंदू गुरूचे अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यावर त्या साधकात सकारात्मक ऊर्जा निर्माण न होणे

सर्वच व्यक्ती, वस्तू किंवा वास्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. चाचणीच्या आरंभी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती. त्याने साधना न करणारे एक लेखक आणि एक भोंदू गुरु यांनी स्वतंत्रपणे लिहिलेली अध्यात्मावरील पुस्तके वाचल्यामुळे त्या साधकात सकारात्मक ऊर्जा काहीच निर्माण झाली नाही. याउलट तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या त्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्या केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १५० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ त्या साधकामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्याला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाला, हे यावरून लक्षात येते.

३ अ १ अ ३. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्याच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे

सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. चाचणीपूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाची प्रभावळ १.८३ मीटर होती. त्या साधकाने साधना न करणार्‍या एका लेखकाने लिहिलेले अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यानंतर त्याची प्रभावळ ३४ सेंटीमीटरने घटून ती १.४९ मीटर झाली. त्या साधकाने एका भोंदू गुरूने लिहिलेले अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या प्रभावळीत २५ सेंटीमीटरने वाढ झाली, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्या प्रभावळीत ५४ सेंटीमीटरने वाढ झाली. यावरून लक्षात येते की, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्याच्या प्रभावळीत सर्वांत जास्त वाढ झाली.

या सर्व सूत्रांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ५ मध्ये दिले आहे.

३ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या संदर्भातील निरीक्षणे

३ अ २ अ. प्रयोगातील निरीक्षणांचे विवेचन

३ अ २ अ १. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने साधना न करणारे एक लेखक आणि एक भोंदू गुरु यांनी लिहिलेल्या अध्यात्मावरील पुस्तकांचे वाचन केल्यामुळे त्या साधकामध्ये थोड्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

प्रथम आपण इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात घेतलेली निरीक्षणे पाहू. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये चाचणीच्या आरंभी ही नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती; पण त्याने साधना न करणार्‍या एका लेखकाने लिहिलेले अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यानंतर केलेल्या त्याच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ त्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात निर्माण झाली. त्या साधकाने एका भोंदू गुरूने अध्यात्मावर लिहिलेले पुस्तक वाचल्यावरही त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. याउलट त्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचण्यापूर्वी आणि वाचल्यानंतरही त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा दिसून आली नाही. याचा अर्थ आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने साधना नसणारे एक लेखक आणि एक भोंदू गुरु यांनी लिहिलेल्या अध्यात्मावरील पुस्तकांचे वाचन केल्यामुळे त्याच्यावर त्या पुस्तकांतील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम झाला, असा होतो.

चाचणीच्या आरंभी आणि नंतर केलेल्या निरीक्षणांत आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

३ अ २ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्या साधकात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे; पण तशी ऊर्जा त्या साधकाला साधना न करणारे एक लेखक किंवा एक भोंदू गुरु यांच्या अध्यात्मावरील पुस्तकांच्या वाचनाने न मिळणे

सर्वच व्यक्ती, वस्तू किंवा वास्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. चाचणीच्या आरंभी आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती. त्याने साधना न करणारे एक लेखक आणि एक भोंदू गुरु यांनी स्वतंत्रपणे लिहिलेली अध्यात्मावरील पुस्तके वाचल्यामुळे त्याच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही. याउलट त्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्या केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. त्या ग्रंथाच्या वाचनामुळे त्या साधकामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि तिची प्रभावळ ८७ सेंटीमीटर दूरपर्यंत होती. याचा अर्थ आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्याला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभ झाला, असे म्हणता येईल.

३ अ २ अ ३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यामुळे त्याच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे

सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. चाचणीच्या आरंभी आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाची प्रभावळ १.८ मीटर होती. त्याने साधना न करणार्‍या एका लेखकाचे अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या प्रभावळीत ३३ सेंटीमीटरने घट झाली. त्या साधकाने एका भोंदू गुरूने लिहिलेले अध्यात्मावरील पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या प्रभावळीत ७ सेंटीमीटरने वाढ होऊन ती १.७ मीटर झाली. या तुलनेत त्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्या प्रभावळीत ४९ सेंटीमीटरने वाढ होऊन ती २.२१ मीटर झाली, म्हणजे त्यात लक्षणीय वाढ झाली.

या सर्व सूत्रांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ५ मध्ये दिले आहे.

 

४. निष्कर्ष

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, तर साधना न करणारे एक लेखक आणि एक भोंदू गुरु यांनी लिहिलेले पुस्तक वाचणे आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे, हे या चाचणीतून लक्षात येते.

 

५. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

५ अ. साधनेचे पाठबळ नसल्याने एका लेखकाने अध्यात्मावर लिहिलेल्या लिखाणात चैतन्य नसणे

या चाचणीत अंतर्भूत केलेल्या पुस्तकाचा लेखक स्वत: साधना करत नाही. साधना नसल्यास त्या व्यक्तीला अध्यात्मातील अनुभूती आलेल्या नसतात. त्यामुळे ती व्यक्ती अध्यात्म म्हणजे काय ?, हे सांगू शकत नाही. तसेच ती कल्पनाविलास आणि बुद्धी यांच्या आधारे अध्यात्मावरील लिखाण करते. त्यामुळे त्या लिखाणामध्ये सत्यतेचे प्रमाण अल्प असू शकते, तसेच त्यामध्ये अनेक त्रुटीही असू शकतात. अध्यात्म हा बौद्धिक स्तरावर समजून घेण्याचा विषय नाही, तर तो प्रत्यक्ष कृती करून, म्हणजे साधना करून अनुभूती घेण्याचा विषय आहे. साधनेच्या अभावामुळे अशा लेखकाला ईश्‍वरी साहाय्य मिळत नाही. त्यामुळे त्याच्या लिखाणात चैतन्य निर्माण होत नाही. लिखाणात चैतन्य नसल्यानेच चाचणीतील दोन्ही वाचकांना हे लिखाण वाचल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळालीच नाही, उलट नकारात्मक ऊर्जाच मिळाली.

५ आ. एका भोंदू गुरूने अध्यात्मावर लिहिलेल्या पुस्तकामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक आणि
मायावी स्पंदने असणे अन् या मायावी स्पंदनांचा परिणाम चाचणीतील दोन्ही वाचकांवर दिसून येणे

सर्वसाधारणपणे भोंदू गुरूंमध्ये लोकेषणा, धनाची आशा, दुसर्‍यांकडून अपेक्षा आणि अहं अधिक असल्याने त्यांना वाईट शक्तींचा (टीप) त्रास होण्याची शक्यता अधिक असते. चाचणीतील अध्यात्मावरील या पुस्तकाचा लेखक असणार्‍या या भोंदू गुरूलाही वाईट शक्तींचा त्रास आहे. अशा स्थितीत खरेतर त्या लेखकाच्या माध्यमातून वाईट शक्तीच लिखाण करण्याची शक्यता अधिक असते. अशा पुस्तकाचे वाचन करणारी व्यक्ती वाईट शक्तींच्या त्रासाला सहज बळी पडू शकते.

चाचणीतील दोन्ही वाचकांना या लिखाणाच्या वाचनाने सकारात्मक ऊर्जा अजिबात मिळाली नाही. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकाने हे लिखाण वाचल्यावर त्याची नकारात्मक ऊर्जा थोडी वाढली आणि तरीही त्याची प्रभावळही थोडी वाढली. या विरोधाभासाला लिखाणातील मायावी स्पंदने कारणीभूत आहेत. मायावी स्पंदनांमुळे व्यक्तीला ते लिखाण चांगले आहे, असे वाटू शकते. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावरही या मायावी स्पंदनांचा परिणाम झाला. या लिखाणाच्या वाचनाने त्याची नकारात्मक ऊर्जा न्यून न होता आणि त्याला सकारात्मक ऊर्जाही न मिळता त्याची प्रभावळ मात्र वाढली.

टीप – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत.

५ इ. संत ईश्‍वरेच्छेने लिखाण करत असल्याने त्यांच्या लिखाणात
पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे आणि या चैतन्याचा परिणाम चाचणीतील दोन्ही वाचकांची
नकारात्मक ऊर्जा न्यून होण्यातून, तसेच त्यांची सकारात्मक ऊर्जा अन् प्रभावळ वाढण्यातून दिसून येणे

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले ।, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत ! संतांनी ईश्‍वरप्राप्तीसाठी स्वतः कठोर साधना केली असल्याने ते अध्यात्म म्हणजे काय ?, हे नेमकेपणाने सांगू शकतात. जसजशी आध्यात्मिक पातळी (टीप) वाढत जाते, तसतसे स्वेच्छेचे रूपांतर परेच्छेत आणि परेच्छेचे रूपांतर ईश्‍वरेच्छेत होते; म्हणून संतांच्या पातळीला जे काही होते, ते बहुधा ईश्‍वरेच्छेनुसारच होत असते. त्यामुळे ग्रंथलिखाणाची प्रेरणा देणारा ईश्‍वर आहे आणि ते करवून घेणाराही ईश्‍वर आहे, असा संतांचा भाव असतो. त्यामुळे संतांनी लिहिलेल्या ग्रंथात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण होेते. संतांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन अन् अभ्यास करणार्‍याला त्या चैतन्याचा लाभ होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु संत भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अध्यात्मातील विविध विषयांवर सप्टेंबर २०१७ पर्यंत ३०४ ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांचे ११ भारतीय भाषांत आणि ६ विदेशी भाषांत भाषांतर झाले आहे. एवढेच नव्हे, तर १३ सहस्र विषयांवर ८ सहस्रहून अधिक ग्रंथ होतील, एवढे लिखाण प्रकाशित होण्याच्या प्रतीक्षेत ाहे. या ग्रंथांचे उद्देश अध्यात्मातील सर्व अंगांविषयी सखोल ज्ञान समाजाला देणे, सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्र उद्धृत करणे आणि सध्याच्या कलियुगातील जिवांना समजेल असे वैज्ञानिक परिभाषेतील ज्ञान देणे, हे आहेत.

चाचणीतील दोन्ही वाचकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला अध्यात्मावरील ग्रंथ वाचल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली, तसेच त्यांची सकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळही वाढली. या ग्रंथवाचनाचा त्यांना अशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.

टीप – संतांची आध्यात्मिक पातळी : निर्जीव वस्तू म्हणजे शून्य टक्का आणि ईश्‍वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्‍चित करता येते. कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्‍यांना संत म्हणतात. आध्यात्मिक पातळी ७० ते ७९ टक्के असणार्‍यांना गुरु, ८० ते ८९ टक्के असणार्‍यांना सद्गुरु आणि ९० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्‍यांना परात्पर गुरु म्हणतात.

 

६. लेखकाचे लिखाण, संतांचे लिखाण आणि भोंदू संतांचे लिखाण

पुढील सारणीत साधना नसलेल्या लेखकाचे लिखाण, संतांचे लिखाण आणि भोंदू संतांचे लिखाण यांतील भेद स्पष्ट केला आहे.

(संकलक : परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यानात मिळालेले ज्ञान)

या सारणीवरून एक गोष्ट लक्षात येईल की, संतवाङ्मयात इतर वाङ्मयापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्ती असते. या शक्तीमुळेच ते वाङ्मय काळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन टिकून रहाते.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.१०.२०१७)

ई-मेल : [email protected]