यवतमाळ जिल्ह्यात ४ ठिकाणी महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
हिंदु धर्माला उत्पत्ती, स्थिती आणि लय ही बंधने लागू होत नाहीत. हिंदु धर्माचा नाश कधीही होऊ शकत नाही. हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न केल्याने आपली साधना होणार आहे, असे मार्गदर्शन यवतमाळ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित असणारे प्रमुख अतिथी श्री. सूरज गुप्ता यांनी केले.
