
जमशेदपूर (झारखंड) – येथील बिरसानगर भागातील श्री हनुमान मंदिराच्या वतीने मंदिर परिसरात नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. सुदामा शर्मा आणि श्री. बी.भी. कृष्णा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी झाडांना फळे-फुले देणार्या धरणीमातेला भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक नागरिक कोरोना विषयीच्या नियमांचे पालन करत उत्स्फूर्त सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी मंदिराचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजन गोराई यांनी सनातन संस्थेला निमंत्रण दिले होते. सनातन संस्थेच्या साधकांविषयी गौरवोद्गार काढतांना श्री. गोराई म्हणाले, ‘‘वृक्षारोपणासारखे महान कार्य अन्य प्रतिष्ठित लोकांकडून करण्यापेक्षा सनातनच्या साधकांकडूनच करावे, असे मला वाटले.’’
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !