शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांना सनातन संस्थेकडून श्रद्धांजली !

मुंबई – कथित गैरव्यवस्थापनाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक मोठी मंदिरे स्वतःच्या नियंत्रणात घेतली. अनेक मंदिरांतील भक्तांचे विश्वस्त मंडळ विसर्जित केले. त्या वेळी भक्तांच्या माध्यमांतून सचोटीने कार्य करून मंदिर व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळून मंदिर सरकारीकरणाला पर्याय निर्माण करणारे शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी सर्व हिंदू आणि मंदिर विश्वस्त यांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याचा आदर्श सर्वच मंदिरांच्या विश्वस्तांनी घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी कै. शिवशंकर पाटील यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतांना केले. याविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आवाहन श्री. राजहंस यांनी केले.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ‘हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन निधर्मी सरकारने नव्हे, तर सश्रद्ध भक्तांच्या हातातच असायला हवे’, ही भूमिका प्रथमपासून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी मांडली आहे. या भूमिकेला अनुरूप असे कार्य ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी केले आहे. आज याच उद्देशाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, पुरोहित आणि अधिवक्ते हे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संघटित होत आहेत. तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील घोटाळे आणि भ्रष्टाचार उघड करून त्या विरोधात लढा देत आहेत. शिवशंकर पाटील यांनी नेहमीच सनातनच्या धर्मरक्षणाच्या कार्याला सहकार्य केले होते. महाराष्ट्र सरकार आणू पहात असलेल्या मंदिर सरकारीकरण, तसेच धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधातही त्यांनी मोलाचे साहाय्य केले होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !