रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुपूजन !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, गुजराती, कन्नड अन् मल्ल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री व्यासपूजन, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘भक्तवात्सल्य आश्रमा’त प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला आजपासून प्रारंभ !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे

स्वतःचे मृत्यूपत्र (इच्छापत्र) सिद्ध करा आणि त्यामुळे होणारे लाभ लक्षात घेऊन संभाव्य अडचणी टाळा !

सर्व घटकांचा विचार करता ‘आपण संपूर्ण आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती (स्थावर आणि चल (धन, शेअर्स, सोने, चांदी आदी संपत्ती) मिळवली, तिचा उपभोग आपल्या पश्चात ‘कुणी आणि कसा घ्यावा ?’ याविषयीचा निर्णय आपण इच्छापत्राद्वारे (मृत्यूपत्राद्वारे) स्वतःच स्पष्ट केल्यास ‘त्या मालमत्तेचे पुढे काय होईल ?’ याची काळजी आपल्याला उरत नाही.

जर्मनीमध्ये पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता

जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे आलेेल्या पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ! या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे.

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा भाव अन् जवळीक यांचा दुरुपयोग करून धन गोळा करणार्‍या तथाकथित स्वामींपासून सावधान !

सनातनच्या ओळखीचा उपयोग करून स्वत:चे प्रस्थ निर्माण करणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवणे, ही या स्वामींची कार्यपद्धत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणी सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या ओळखीचा दुरुपयोग करत असल्यास त्याच्या संपर्कात राहू नये.

गुरुकार्यासाठी अर्पण स्वरूपात मिळालेल्या धनाचा अपव्यय करणार्‍यांची माहिती कळवा !

‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.

वराड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. परूळेकर महाराज यांचा देहत्याग !

प.पू. परूळेकर महाराज गेले काही मास आजारी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला दुपारी २.१५ वाजता ‘श्रीरामनगरी’ आश्रमातील श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर या मंदिरांच्या मधल्या परिसरात समाधीस्त करण्यात आले.