उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आगामी भीषण काळाच्या संदर्भात वर्तवलेली भविष्यवाणी पुढे देत आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते.

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून वादळापासून बचाव करण्यासाठी देशातील १५ जिल्ह्यांतील २ लाख १९ सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनने क्रिमियातील कर्च पूल पाडल्याचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तेथील १० शहरांवर आक्रमण केले, अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. रशियाने कीववर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे सहस्रो नागरिकांना छावण्या आणि भूमीगत मेट्रोस्थानके येथे आश्रय घ्यावा लागला.

२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !

आतापर्यंत अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळांपैकी ‘इयान’ चक्रीवादळ हे सर्वांत शक्तीशाली असल्याचे सांगण्यात येत आहे. वादळामुळे संपूर्ण फ्लोरिडा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये लाखो लोक पूरग्रस्त होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !

अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांची हानी झाल्यामुळे पशूधनाचे उत्पादन अल्प होऊ शकते.

पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

पाकच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ३० लाख लोक बेघर झाले आहेत.

जगभरातील तापमानात वाढ आणि त्याचे परिणाम !

सध्या जगभरातील बहुतांश शहरांच्या पार्‍याने चाळीशी पार केली आहे. वाढत्या हरितवायू उत्सर्जनामुळे जगभरातच तापमान वाढले आहे. ‘नासा’ने (‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने) काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अवकाशातून घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रांमध्येही पुष्कळ मोठा पालट दिसत आहे. अलीकडे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये या वसुंधरेचा रंग अतीउष्णतेने लाल झालेला दिसत आहे. या संदर्भात पर्यावरणतज्ञ वेळोवेळी चिंता व्यक्त करत चेतावणी देत … Read more

उष्णतेच्या तडाख्यात युरोप !

तापमानातील ही वाढ एकाएकी नाही. या विषयावर संशोधन करणार्‍या तज्ञांच्या गटाने ‘या तापमानवाढीला मानवी चुकाच कारणीभूत आहेत’, असा निष्कर्ष काढला आहे. घर, कारखाना, वाहतूक यांसाठी मोठ्या प्रमाणात तेल, गॅस, कोळसा यांचा वापर, प्रदूषण करणारे उद्योग, उष्णतेचे उत्सर्जन करणारे व्यवसाय यांमुळे तापमानात वाढ होत आहे.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती !

४ जुलै या दिवशी रात्रभर आणि ५ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.