किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !
किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.
किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले ज्ञानयोगी अन् ऋषितुल्य परात्पर गुरु पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांनी रविवार, माघ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५१२० (म्हणजेच ३ मार्च २०१९) या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.
उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.
मथुरा येथील कथावाचक स्वामी प्रणावपुरी महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.
सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे,असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले.
‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल एस्.पी्. सिन्हा यांच्यासह १६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांची १५ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट घेण्यात आली.
काशी येथील महंत मुक्तानंद ब्रह्मचारी यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.
‘भृगु महर्षींच्या सांगण्यानुसार १०.२.२०१९ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री गुरुपादुकांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूजेपुरत्या पायांत घातलेल्या पादुकांचा) पूजासोहळा पार पडला.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनातून धर्मशास्त्राची माहिती देऊन धर्मज्ञान दिले जात आहे. हे प्रदर्शन सर्वांनी पाहून मुलांवर त्याप्रमाणे संस्कार केले पाहिजेत, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील निरंजनी आखाड्याच्या श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी मंदाकिनी महाराज यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.
