चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

तालुक्यातील ४२ गावे बाधित झाली आहेत. नदीकाठच्या गावांतील १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापूस, केळी, मका, हिरवा चारा आदी पिके उद्ध्वस्त झाली. शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन पडीक होण्याचा मोठा धोका आहे.

पुणे येथे श्रीमती उषा कुलकर्णी (वय ७९ वर्षे) या सनातनच्या ११० व्या संत, तसेच श्री. गजानन साठे (वय ७८ वर्षे) हे १११ वे संत घोषित !

वयस्कर असूनआजारपणात एकट्याने सर्व परिस्थिती हाताळणार्‍या, ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा अखंड भाव असणार्‍या, तसेच स्थिरताही  हा स्थायीभाव असलेल्या श्रीमती उषा कुलकर्णी यांना सनातनच्या ११० व्या व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. यासमवेत शांत, नम्र स्वभाव आणि अल्प अहं असलेले अन् शस्त्रकर्म होतांना ईश्वराशी अखंड अनुसंधानात असणारे श्री. गजानन साठे हे १११ वे व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे योगदान हवे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले.

‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणार्‍या वारणानगर येथील डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

एकाच वर्षी पती आणि जावई यांचे निधन, अशा अत्यंत कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर तोंड देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या आणि अत्यंत विनम्र अशा डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १०९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. तसेच त्यांच्या कन्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पी. साईनाथ यांना सनातन संस्थेकडून ‘अनावृत्त पत्र’ !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी दु:ख व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील काही संघटना १४ ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत काही कार्यक्रम आयोजित करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २०.८.२०१३ या दिवशी पुणे येथील ओंकारेश्‍वर पुलावर काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. डॉ. दाभोलकर यांचे समर्थक आणि कुटुंबीय यांना या हत्येविषयी शोक प्रकट करण्याचा हक्क नक्कीच आहे; परंतु २० ऑगस्ट या दिवशी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात आपण मुख्य अतिथी म्हणून संबोधित करणार असल्याचे वाचनात आले.

औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध जिल्ह्यांत औषधी वनस्पतींची लागवड चालू आहे. साधक घरोघरी कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत.

सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत ! – वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे

सनातनचे कुंकू हे मी स्वत: दैनंदिन उपयोगात आणते. मी घरामध्ये नियमित अग्निहोत्र करते आणि त्यासाठी सनातननिर्मित भीमसेनी कापराचा उपयोग करते. कोरोना काळातही भीमसेनी कापराचा चांगला उपयोग झाला. सनातनची उत्पादने या केवळ वस्तू नसून त्या समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत आहेत, असे गौरवोद्गार कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी काढले.

जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, तसेच ‘योग आणि संगीतोपचार’ विषयांतील तज्ञ वैद्य बालाजी तांबे यांचे निधन !

पाच दशके त्यांनी ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रचार अन् प्रसार केला. त्यांनी समाजातील अनेक घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देश यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात त्याचा प्रसार केला

हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे भारतात पूरस्थिती निर्माण होणार ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.