पुणे जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात ‘दत्त जयंती’ महोत्सव पार पडला !

सनातन संस्थेकडून ५२ ठिकाणी ‘आध्यात्मिक ग्रंथ’ तसेच ‘सात्त्विक उत्पादने’ यांचे कक्ष लावण्यात आले.

धकाधकीच्या जीवनात हरवून बसलेली मन:शांती प्रार्थनेमुळे लाभते ! – महेंद्र चाळके, सनातन संस्था

शिबिरामध्ये आनंदी जीवनासाठी साधना करणे का महत्त्वाचे आहे ? व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व आणि ती कशी राबवतात ? हे सांगण्यात आले.

पळस्पे (पनवेल) येथील ‘मोदी मोटर्स’ आस्थापनात सनातन संस्थेचे ‘तणावमुक्तीसाठी साधना’ विषयावर व्याख्यान !

मनुष्याच्या जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक असतात. आपल्या पूर्वआयुष्यातील संचित, प्रारब्ध आणि वर्तमानातील कर्म यांच्याशी त्या निगडित असतात. या समस्या सोडवण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण, ध्यान करणे, आध्यात्मिक जीवन जगणे, म्हणजेच साधना करणे आवश्यक आहे.

जत येथे ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला आधुनिक वैद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

…कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ यांसारख्या योग्य साधनांचा अवलंब केल्यास आनंदप्राप्ती होऊ शकते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे मिळणारे सुख हे तात्पुरते असते, खरा आनंद हा आध्यात्मिक आचरणानेच मिळतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे केले.

हिंदुत्वाच्या कार्याला साधनेची जोड दिल्यास कार्याची फलनिष्पत्ती अधिक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर कार्य करत आहेत. यात गोरक्षण, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांसह अन्य अनेक कार्यांचा समावेश आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य करतांना त्याला साधनेची जोड दिल्यास त्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक होते, असे मौलिक मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

सर्व वैद्यांसह सामान्य नागरिकांनी ‘जीवन संजीवनी तंत्र’ (CPR) शिकून घेणे काळाची आवश्यकता ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपत्कालीन प्रसंग सातत्याने येत असतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘प्रथमोपचार आणि जीवन संजीवनी तंत्र’ (सी.पी.आर्.) शिकून घ्यावे. संघटनेच्या सर्व वैद्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला यासाठी प्रशिक्षित करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले.

‘महापारेषण’च्या वांद्रे (मुंबई) येथील कार्यालयातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

आत्मनिर्भर भारत, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि महिलांसाठी रोजगाराची संधी या हेतूने दिवाळीच्या निमित्ताने वांद्रे येथील ‘महापारेषण’च्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड) कार्यालयामध्ये विविध स्वदेशी उत्पादनांचे कक्ष उभारण्यात आले होते.

देव, देश, धर्म रक्षणासाठी कृतीशील आणि ठोस संघटन आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’, ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि ‘वक्फ बोर्डा’द्वारे भूमींचा दुरुपयोग यांसारख्या समस्यांवर व्यापक जागृती अन् कायदे आवश्यक आहेत. हिंदु समाजासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करून आध्यात्मिक बळ वाढवायला हवे……..

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त प्रवचन आणि सामूहिक नामजप पार पडला !

नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘अशोका सिटी सोसायटी’मधील ज्योती गुप्ता आणि शैलजा धिमान यांच्या निवासस्थानी प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

देहली येथील रमेशनगर ब्लॉक ९ मधील श्री सनातन धर्म महावीर मंदिर सभेच्या हनुमान मंदिरामध्ये ‘नवरात्र’ विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या वेळी घटस्थापना, कुंकूमार्चन आणि कन्यापूजन यांविषयी …