पळस्पे (पनवेल) येथील ‘मोदी मोटर्स’ आस्थापनात सनातन संस्थेचे ‘तणावमुक्तीसाठी साधना’ विषयावर व्याख्यान !

साधनेने ‘तणाव नियंत्रण’ शक्य ! – श्रीकृष्ण उपाध्ये, सनातन संस्था

कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री. श्रीकृष्ण उपाध्ये

पनवेल – मनुष्याच्या जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक असतात. आपल्या पूर्वआयुष्यातील संचित, प्रारब्ध आणि वर्तमानातील कर्म यांच्याशी त्या निगडित असतात. या समस्या सोडवण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण, ध्यान करणे, आध्यात्मिक जीवन जगणे, म्हणजेच साधना करणे आवश्यक आहे. साधनेने आपल्या जीवनातील तणाव नियंत्रित ठेवता येतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी येथे केले. पळस्पे येथील ‘मोदी मोटर्स’ या आस्थापनात कर्मचार्‍यांसाठी आयोजित ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

या वेळी श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी कर्मचार्‍यांना तणाव म्हणजे काय ? त्याची कारणे काय ? मनुष्याच्या विविध अवस्थेत आणि विविध क्षेत्रांत तणावाचे प्रकार कोणते ? तणावाचा जीवनावर काय परिणाम होतो ? त्यावर नैसर्गिकरित्या आणि नियोजन करून कसे नियंत्रण मिळवावे ? असे विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप डॉ. आठवले यांचे २५ वर्षांचे महान कार्य उपस्थितांसमोर उलगडले.

या वेळी सनातन संस्था निर्मित ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. ‘मोदी मोटर्स’चे मुख्य अधिकारी डॉ. सुभाष शर्मा यांचे हे व्याख्यान आयोजित करण्यात मोलाचे साहाय्य लाभले. प्रवचन संपल्यावर डॉ. सुभाष शर्मा यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘प्रवचनापासून काय बोध घेतला ? यातून काय शिकायला मिळाले ? आपण सर्वांनी याचा कसा लाभ करून घेतला पाहिजे ?’ याविषयी सांगून सर्वांना प्रोत्साहित केले.

Leave a Comment