
पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.)- ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात दत्त जयंती निमित्त भाविक भक्तांच्या वतीने जिल्ह्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेकडून ५२ ठिकाणी ‘आध्यात्मिक ग्रंथ’ तसेच ‘सात्त्विक उत्पादने’ यांचे कक्ष लावण्यात आले.
या कक्षांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी ‘सामूहिक नामजप’, ‘भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचे महत्त्व’ या विषयांवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यालाही दत्तभक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यामध्ये प्रामुख्याने गावठाण येथील रस्ते वाडा दत्त मंदिर, कोथरूड येथील प्रभात रस्त्यावरील श्री गुरुदेव दत्त मंदिर, हडपसर येथील पी.एम्.टी. थांब्याजवळील श्री दत्त मंदिर, सिंहगड रस्ता येथील साईबाबा मंदिर, चिंचवड येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळ या व अशा अन्य ठिकाणी जिज्ञासूंसाठी ‘सनातन कक्ष’ उभारण्यात आले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कक्षांना भेटी दिल्या आणि सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने यांविषयी जाणून घेतले.
२. जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !