धकाधकीच्या जीवनात हरवून बसलेली मन:शांती प्रार्थनेमुळे लाभते ! – महेंद्र चाळके, सनातन संस्था

खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना सत्संग शिबिर

डावीकडून मार्गदर्शन करतांना श्री. महेंद्र चाळके आणि श्री. विजय भुवड

खेड, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रार्थनेमुळे मनाला शांती मिळते. दिवसभरात आपली कुणावर तरी चिडचिड होत असते, आपल्‍या मनासारखे काही होत नाही, कामे खोळंबतात, उशीर होतो, धावपळ होते, असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. या सगळ्‍यामुळे आपण दैनंदिन धकाधकीच्‍या जीवनात आपली मनःशांती हरवून बसतो. ती मनःशांती प्रार्थनेमुळे मिळते. प्रार्थनेमुळे सकारात्‍मकता निर्माण होते. अशक्य गोष्‍टी शक्‍य वाटतात; कारण प्रार्थनेमुळे ईश्वराचा आशीर्वाद लाभतो. प्रार्थनेसमवेत नामजप आणि कृतज्ञता व्यक्त करणेही महत्त्वाचे आहे, यामुळे अहंकार अल्प होण्यास साहाय्य होते, असे प्रतिपादन श्री. महेंद्र चाळके यांनी केले.

रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना सत्संग शिबिर झाले. त्या वेळी ते बोलत होते. दापोली, खेड, चिपळूण आणि सावर्डे येथील ७० युवक-युवतींनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

शिबिर उपस्थिती

शिबिराचा उद्देश डॉ. हेमंत चाळके यांनी मांडला. शिबिरामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय सांगण्यात आला, तसेच आनंदी जीवनासाठी साधना करणे का महत्त्वाचे आहे ? व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व आणि ती कशी राबवतात ? हे सांगण्यात आले. सत्संग, सत्सेवा, भावजागृती आणि निरपेक्षप्रेमाचे महत्त्व याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांनी मार्गदर्शन केले.

शिबिरात शेवटी गटचर्चेच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला युवा साधना सत्संग चालू करण्याचे नियोजन करण्यात आले.

Leave a Comment