देव, देश, धर्म रक्षणासाठी कृतीशील आणि ठोस संघटन आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक

सोलापूर – ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि ‘वक्फ बोर्डा’द्वारे भूमींचा दुरुपयोग यांसारख्या समस्यांवर व्यापक जागृती अन् कायदे आवश्यक आहेत. हिंदु समाजासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करून आध्यात्मिक बळ वाढवायला हवे. हिंदु राष्ट्राच्या तत्त्वावर एकात्मता आणि धर्माधिष्ठित राजकीय चौकट असायला हवी. हिंदुत्वाविरुद्ध चालणार्‍या प्रयत्नांविरोधात कायदेशीर कारवाई आणि सामाजिक जागृती करणे आवश्यक आहे. देव, देश, धर्म रक्षणासाठी कृतीशील आणि ठोस संघटन करायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. आगामी काळात सनातन धर्माचे रक्षण आणि हिंदु संस्कृतीचा प्रसार हे प्रमुख उद्देश ठेवून ८ ऑक्टोबर २०२५ या दिवशी श्री.स.स. नागनाथ अल्ली महाराज सत्संग भवन, सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सद्गुरु स्वाती खाडये बोलत होत्या.

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारात स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग, सनातन धर्माचे वैश्विक महत्त्व आणि विविधतेतील समन्वय यांवर भर देत ‘वसुधैव कुटुम्बकम्’चे तत्त्व स्मरण केले. शेवटी, देव-देश-धर्म यांचे रक्षण करण्यासाठी कृतीशील आणि ठोस संघटन यांची आवश्यकता असल्याचे सर्वानुमते ठरले. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. यश मुगड्याल यांनी केले, तर समितीच्या कार्याचा परिचय कु. वर्षा जेवळे यांनी करून दिला.

वैशिष्ट्यपूर्ण

सभेनंतर उपस्थितांनी हिंदु राष्ट्राची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

सभेनंतर आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये धर्मप्रेमींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग, धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग यांची उत्स्फूर्तपणे मागणी केली.

सभेसाठी श्री. अंबादास पासकंठी यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.

Leave a Comment