जीवनातील समस्यांचे मूळ घालवण्यासाठी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जत (जिल्हा सांगली), १० नोव्हेंबर (वार्ता.) – जीवनातील बहुतांश समस्यांचे मूळ कारण आध्यात्मिक असते, त्यामुळे केवळ बाह्य उपायांवर अवलंबून न रहाता आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. योग्य साधना केल्यास मनुष्य जीवनातील सुख-दुःखांवर मात करू शकतो आणि सतत आनंदी राहू शकतो. विज्ञान समजून घेऊन आध्यात्मिक साधना केली असता जीवन आनंदी होते. कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ यांसारख्या योग्य साधनांचा अवलंब केल्यास आनंदप्राप्ती होऊ शकते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे मिळणारे सुख हे तात्पुरते असते, खरा आनंद हा आध्यात्मिक आचरणानेच मिळतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे केले.

जत येथील केमिस्ट भवन येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचा जत येथील २४ नामांकित आधुनिक वैद्यांनी लाभ घेतला. या वेळी डॉ. श्रीमती शिल्पा कोठावळे यांनी ‘जीवनातील ताणतणाव न्यून करून आनंद कसा मिळवायचा ?’, याची ‘प्रोजेक्टर’वर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जत येथील आधुनिक वैद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपस्थित आधुनिक वैद्य
डॉ. शालिवान पट्टणशेट्टी, डॉ.(सौ.) सरिता पट्टणशेट्टी, डॉ.(सौ.) वीणा तंगडी, डॉ. शंकर तंगडी, डॉ. सचिन वाघ, डॉ. अक्षय कायपुरे, डॉ. चिक्कोडी, डॉ. सचिन ऐनापुरे, डॉ. सतीश मोगली
आधुनिक वैद्यांचे अभिप्राय
१. डॉ. आनंद पाटील, जत – असे कार्यक्रम झाले पाहिजेत. आपल्याला धर्माविषयी माहिती पाहिजे.
२. केमिस्ट बाहुबली मालगत्ते, जत – कार्यक्रम छान झाला. आता असा कार्यक्रम लहान मुलांसाठी घ्या; कारण लहान मुलांवर संस्कार होणे आवश्यक आहे.
३. डॉ. योगेश नागणे, जत – असा ताणतणाव सर्वांनाच आहे. ज्या व्याख्या सांगितल्या आहेत, त्या व्याख्या आयुर्वेदामध्ये आहेत; पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. या कार्यक्रमामुळे लक्षात आले कुठे कार्यक्रम असल्यास मला कळवा मी येईन.
४. डॉ. (सौ.) उमा पाटील, जत – कार्यक्रम आवडला, मी ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडते.
५. डॉ. अक्षय कायपुरे – असे कार्यक्रम सर्वांनाच आवश्यक आहेत. १५ दिवसांतून आम्ही कार्यक्रमासाठी वेळ काढतो !
६. डॉ. रमेश नागराळे – कार्यक्रम अतिशय छान होता. आम्हाला वेळ अल्प असतो; पंरतु हे आवश्यक आहे.
७. डॉ. सरिता पट्टणशेट्टी, जत – तुमचे उपक्रम पुष्कळ छान आहेत.
८. डॉ. सचिन ऐनापुरे, जत – तुमचा कार्यक्रम पुष्कळ छान आहे.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...