
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २२ ऑक्टोबर (वार्ता.) – आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपत्कालीन प्रसंग सातत्याने येत असतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘प्रथमोपचार आणि जीवन संजीवनी तंत्र’ (सी.पी.आर्.) शिकून घ्यावे. संघटनेच्या सर्व वैद्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला यासाठी प्रशिक्षित करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. ‘मलकापूर शाहूवाडी तालुका वैद्यकीय संघटने’च्या सलग २५ व्या वर्षी आयोजित ‘श्री धन्वन्तरि जयंती’ सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी खोट्या आरोपांखाली अटकेत असलेल्या निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेविषयी आनंद व्यक्त करण्यात आला. आरतीपूर्वी ‘श्री धन्वंतरये नमः।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष वैद्य महेश सुतार, वैद्य भरत पाटील, वैद्य ज.बा. पाटील, वैद्या अस्मिता सुतार, वैद्य श्री. आणि सौ. मोहिनी अंबिके यांसह ३० वैद्यांनी याचा लाभ घेतला. ‘शैलेश नर्सरी’चे श्री. सुबोध भिंगार्डे, श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, श्री. ओजस भिंगार्डे यांची विशेष उपस्थिती होती.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...