हिंदुत्वाच्या कार्याला साधनेची जोड दिल्यास कार्याची फलनिष्पत्ती अधिक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये यांचे जयसिंगपूर येथे हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन

मार्गदर्शनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, तसेच मान्यवर

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – आपण सर्वजण विविध संघटना, पक्ष, संप्रदाय यांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म, तसेच हिंदुत्वाचे कार्य करत आहोत. प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर कार्य करत आहेत. यात गोरक्षण, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांसह अन्य अनेक कार्यांचा समावेश आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य करतांना त्याला साधनेची जोड दिल्यास त्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक होते, असे मौलिक मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. हिंदुत्वनिष्ठांसाठी संत गोरोबा कुंभार येथे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. त्या प्रसंगी त्या मार्गदर्शन करत होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांनी केले. या प्रसंगी पूर्व विभाग कोल्हापूरचे भाजप सरचिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, व्यापारी संघटनेचे श्री. निर्मल पोरवाल, ‘श्री स्वामी समर्थ केंद्रा’चे विश्वस्त श्री. विनय कदम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रोहित वरक, श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. दशरथ हेरवाडे, ‘गीता परिवार’च्या सौ. उज्ज्वला पवार यांसह अन्य उपस्थित होते.

Leave a Comment