कुंभमेळ्यात सनातन संस्था आयोजित ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ याचे उद्घाटन !
सनातन धर्म, संस्कृति आणि परंपरांचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार समजावून देणारे ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सनातन संस्था शिबीर, सेक्टर ९, गंगेश्वर महादेव मार्ग, प्रयागराज येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत खुले राहील.