
मथुरा (उत्तरप्रदेश) – नवरात्रोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘अशोका सिटी सोसायटी’मधील ज्योती गुप्ता आणि शैलजा धिमान यांच्या निवासस्थानी प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका डॉ. पूनम शर्मा यांनी नवरात्रोत्सवात देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी देवीचा जप कसा करावा ?, कुंकूमार्चन कसे करावे ?, देवीची ओटी कशी भरावी ? इत्यादींविषयी माहिती सांगितली. या वेळी उपस्थित सर्व जिज्ञासूंनी देवीच्या मूर्तीवर कुंकूमार्चन केले आणि ओटी भरली.
क्षणचित्र
एका जिज्ञासूने सांगितले, ‘‘मी माझ्या वडिलांच्या सल्ल्यानुसार नेहमीच कोणत्याही देवीची पूजा करतांना कुंकू अर्पण करत असते; परंतु प्रवचनात केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना यामागील शास्त्र समजल्याने पुष्कळ आनंद झाला.’’
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला