
मुंबई – आत्मनिर्भर भारत, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि महिलांसाठी रोजगाराची संधी या हेतूने दिवाळीच्या निमित्ताने वांद्रे येथील ‘महापारेषण’च्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड) कार्यालयामध्ये विविध स्वदेशी उत्पादनांचे कक्ष उभारण्यात आले होते. यानिमित्त येथे असलेल्या सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार आणि अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक सौ. सुचिता भिकाने यांनी सनातनच्या प्रदर्शनाला भेट दिली.
१७, १८ ऑक्टोबर असे २ दिवस हे ग्रंथप्रदर्शन आणि स्वदेशी सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष लावण्यात आला होता. या ठिकाणी आयुर्वेद, आपत्काळात घ्यावयाची दक्षता, नैतिक मूल्ये-संस्कार, भारतीय संस्कृतीनुसार दिनचर्येचे महत्त्व, अध्यात्म, तणावमुक्त जीवनासाठी उपाययोजना आदी विविध विषयांचे ग्रंथ या कक्षावर उपलब्ध होते. कार्यक्षमता, एकाग्रता राखून तणावमुक्त, चुका टाळून आणि उत्साहाने कामकाज कसे करावे, याविषयी उत्तम मार्गदर्शन असलेल्या प्रदर्शनातील ग्रंथांचा येथील कर्मचारीवर्ग आणि नागरिक यांना चांगला लाभ झाला.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला