हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्थेच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे २ दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ आणि १० ऑगस्ट या दिवशी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात धर्मप्रेमींसाठी दोन दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नई येथील आदिपराशक्ती मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

तमिळनाडूच्या चेन्नईमधील अरुंबक्कम् येथील आदिपराशक्ती मंदिरात वरलक्ष्मी व्रताच्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनच्या साधिका श्रीमती कृष्णवेणी आणि श्रीमती गीता लक्ष्मी यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सहभाग घेतला.

अमरावती येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग !

येथे १२ आणि १३ ऑगस्ट अशी दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. उत्तम संघटक बनण्यासाठी साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रकियाही राबवणार, असा निर्धार येथे करण्यात आला.

कोल्हापूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचने !

शिरोळ येथील गणेश मंदिरात सनातन संस्थेच्या सौ. सुप्रिया घाटगे यांनी ‘श्री गणेश चतुर्थी व्रत’ यावर मार्गदर्शन केले. या वेळी महिलांनी ग्रामपंचायत येथे गणेशोत्सवाचे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहू, असे सांगितले, तसेच धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.

संभाजीनगर येथे १५ ऑगस्टनिमित्त जिल्हाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सनातन संस्थेच्या वतीने निवेदन

संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी श्री. नवल राम यांना १५ ऑगस्टनिमित्त निवेदन देण्यात आले.

गडचिरोली येथे सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन शिबिराचे आयोजन

श्री गुरुमंदिर नागपूरप्रणित प.पू. श्री विष्णूदास महाराज अध्यात्म साधना केंद्रातील साधकांसाठी ४ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सौ. मंदाकिनी डगवार यांनी सनातन संस्थेच्या वतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; सनातन संस्थेचाही सहभाग !

येथील प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. कुरणे आणि गटशिक्षण अधिकारी  जी.बी. कमळकर यांना १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखून त्याचा मान राखावा, या मागणीचे निवेदन २ ऑगस्टला देण्यात आले.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला ! – तहसीलदारांना निवेदन

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना देण्यात आले.

विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत सनातन संस्थेचा सहभाग !

येथे ३० जुलै या दिवशी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी वस्तूंची खरेदी आणि विक्री करू नये, यासाठी भव्य जनजागृती फेरी काढली. यात मोठ्या संख्येने महिला आणि युवा वर्ग सहभागी झाला होता.

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी वस्तूंची होळी

आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध हिंदुप्रेमी संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.