सोलापूर येथील नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला प्रारंभ
सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सोलापूर येथील दत्त चौक, दत्त मंदिराच्या जवळ लावण्यात आले आहे. येथील भाजपचे नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला.