गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील ‘विजयवाडा बूक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन

गुंटूर – शहरात प्रथमच विजयवाडा बूक फेअरमध्ये विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी विविध ग्रंथ प्रकाशक संस्थांचे ६५ स्टॉल्स उभारण्यात आले होते. या प्रदर्शनात साधकांना सनातनच्या ग्रंथांचा स्टॉल उभारण्याची संधी मिळाली. येथे सनातनचे तेलुगु भाषेतील ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी धर्मशिक्षण देणारे फलकही लावण्यात आले होते. अनेक जिज्ञासूंनी हे फलक वाचण्यात रूची दाखवली, तसेच ग्रंथ प्रदर्शनालाही भेट दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात