सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये युवा पिढीसाठी मार्गदर्शन

चार दिवसीय ‘युवा साधक प्रशिक्षण शिबिरा’स प्रारंभ !

मिरज आश्रम

मिरज येथील शिबिरार्थीं

शिबिराच्या माध्यमातून आदर्श युवा साधक बनायचे आहे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

मिरज – साधना आणि नामजप यांचे महत्त्व, स्वभावदोष-निर्मूलन, आध्यात्मिक उपाय, भावजागृतीचे प्रयत्न, समष्टी सेवा यांसह अनेक गोष्टी युवा साधक प्रशिक्षण शिबिरात शिकायला मिळणार आहेत. ‘मी-माझा जिल्हा’ या वर्तुळातून बाहेर पडून आपल्याला ‘हे विश्‍वचि माझे घर’, या संकल्पनेपर्यंत जायचे आहे. शिबिराच्या माध्यमातून आपल्याला आदर्श युवा साधक बनायचे आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमात युवा साधक प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला. त्या वेळी उद्घाटनप्रसंगी शिबिराचा उद्देश सांगतांना त्या बोलत होत्या. हे शिबीर २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. शिबिरात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून ५३ युवा साधक सहभागी झाले आहेत.

शिबिराच्या प्रारंभी सनातन संस्थेचे साधक श्री. श्रीराम लुकतुके यांनी शंखनाद केला, तर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन ६६ टक्के अध्यात्मिक स्तर असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी केले.

विशेष – शिबिराला येण्यापूर्वी काय जाणवले, हे सांगतांना भोर येथील कु. भक्ती बांदल हिला भावाश्रू अनावर झाले.

 

देवद आश्रम

युवा साधक प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून
साधनेचा पाया भक्कम होईल ! – सौ. संगीता घोंगाणे, प्रसारसेविका

शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना सौ. संगीता घोंगाणे (डावीकडे) आणि सौ. धनश्री केळशीकर
देवद येथील शिबिरार्थीं

देवद (पनवेल) – युवा साधक प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण प्रगल्भ होणार आहात. साधनेचा पायाही भक्कम होईल. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर तुम्हा सर्वांकडून कशी सेवा करवून घ्यायची, यासाठी आयोजित केलेले हे शिबीर म्हणजे भगवंताचे नियोजनच आहे, असे मार्गदर्शन ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या प्रसारसेविका सौ. संगीता घोंगाणे यांनी केले. २४ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात आरंभ झालेल्या ‘युवा साधक प्रशिक्षण शिबिरा’त त्या बोलत होत्या. या वेळी त्यांच्या समवेत सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर याही होत्या. त्यांनी या वेळी गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व विशद केले. या शिबिराची सांगता २७ ऑक्टोबरला होणार आहे. या शिबिरात मुंबई, ठाणे, आणि रायगड हे जिल्हे, तसेच गुजरात राज्य येथून एकूण ३६ युवा साधक सहभागी झाले आहेत.

शिबिरार्थींच्या स्वागतासाठी देवद आश्रमात ठेवलेला स्वागताचा फलक

शिबिराचा प्रारंभ युवा शिबिरार्थी श्री. हर्षल भगत याने केलेल्या शंखनादाने झाला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांनी शिबिराचा उद्देश विशद केला. रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय सांगितला, तर श्री. चोपदार यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली.

‘शिबिराच्या माध्यमातून सर्वच युवा साधक कृतीशील आणि प्रेरित होवोत !’ – प.पू. पांडे महाराज यांचा संदेश

‘युवा साधक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन झाले, हे पाहून आनंद वाटला. शिबिराच्या माध्यमातून सर्वच युवा साधक कृतीशील आणि प्रेरित होवोत ! युवा साधकांच्या अंतर्मनात राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याची सुप्त शक्ती आहेच. ती या शिबिराद्वारे जागृत होईल. युवा साधकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्यासाठीही प्रयत्न करावेत !

Leave a Comment