पुणे येथे सनातनचा अध्यात्मप्रसार

पुणे येथील सनातन प्रभातचे वाचक श्री. जेठाराम चौधरी
यांनी दुकानात सनातनची सात्त्विक उत्पादने, तसेच पंचांग विक्रीसाठी ठेवले

पुणे  – सिंहगड रस्ता येथील माणिकबाग परिसरातील सनातन प्रभातच्या हिंदी पाक्षिकाचे वाचक श्री. जेठाराम चौधरी यांनी त्यांच्या ग्रीन मार्ट या दुकानात सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवून धर्मप्रसाराच्या कार्यात सहभाग नोंदवला आहे. दिवाळीनिमित्त त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने, तसेच सनातन पंचांग दाखवल्यावर त्यांनी दुकानात उत्पादने आणि पंचांग विक्रीसाठी ठेवण्याची सिद्धता दर्शवली. ते म्हणाले, धर्मकार्यात आमचा नेहमीच सहभाग असेल. आम्हाला पूर्णवेळ धर्मकार्यासाठी देता येत नसला, तरी आम्ही नेहमी सनातनच्या कार्याच्या पाठीशी आहोत. आम्हाला जेवढे जमेल, तेवढे आम्ही धर्मकार्य करू. त्यांनी दुकानामध्ये एका स्वतंत्र कप्प्यात सनातनच्या उदबत्त्या, कापूर, साबण, उटणे, कुंकू, अष्टगंध आदी उत्पादने, तसेच सनातन पंचांग २०१८ चे ५० संच विक्रीसाठी ठेवले आहेत. गल्ल्यावर दर्शनी भागातच त्यांनी सनातन दिनदर्शिकाही लावली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment