लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन !

लातूर – येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५४ वे वार्षिक अधिवेशन श्री शिवछत्रपती ग्रंथालय, महानगरपालिका, लातूर आणि जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आणि १६ ऑक्टोबर या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या कालावधीत ग्रंथदिंडी, परिसंवाद (विषय – ग्रंथालयाच्या अडचणी), सेवालय प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम आणि १६ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता उद्घाटन होणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment