छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.